सावली प्रतिष्ठान चिखलेवाडी तर्फे आयोजित ऑनलाइन निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर.

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : सावली प्रतिष्ठान चिखलेवाडी तर्फे आयोजित ऑनलाइन निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या प्रतिष्ठानकडून आज पर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. या कुंभारगाव मर्यादित ऑनलाईन स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी या वर्गातील आठ शाळेतील ऐशी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. 

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: लहान गट - इयत्ता पाचवी ते सातवी. प्रथम क्रमांक - चेतन नितीन गुजर. इयत्ता पाचवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेंडेवाडी, द्वितीय क्रमांक - अनुज आनंदा बोत्रे. इयत्ता सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुंभारगाव नंबर 3, तृतीय क्रमांक - विघ्नेश अमित मोरे इयत्ता पाचवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुंभारगाव नंबर 3. उत्तेजनार्थ क्रमांक - ऋचा संदीप अष्टेकर इयत्ता पाचवी न्यू इंग्लिश स्कूल, कुठरे. *मोठा गट- इयत्ता आठवी ते दहावी.* प्रथम क्रमांक - आरती महादेव वरेकर इयत्ता दहावी वाल्मीकि विद्यामंदिर, तळमावले. द्वितीय क्रमांक - वेदिका अनिल मोरे इयत्ता आठवी लक्ष्मीदेवी हायस्कूल, कुंभारगाव. तृतीय क्रमांक - मधुरा संजय चव्हाण इयत्ता दहावी लक्ष्मीदेवी हायस्कूल, कुंभारगाव. उत्तेजनार्थ क्रमांक हर्ष संदीप अष्टेकर इयत्ता दहावी वाल्मीकि विद्यामंदिर, तळमावले आणि श्रद्धा दीपक मोरे इयत्ता नववी लक्ष्मीदेवी हायस्कूल, कुंभारगाव.

           या स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून श्री शंकर सिताराम मोरे, श्री लक्ष्मण परशुराम वरेकर, श्री उत्तम शिवाजी मोरे, श्री रविंद्र बंडू काटे, श्री विश्वास बबन चिखले, श्री सुरेश रामचंद्र चिखले, श्री युवराज रघुनाथ धोत्रे, श्री ऋषिकेश तात्यासो बोत्रे, श्री विश्वनाथ राजाराम चिखले, श्री अभिजीत भानुदास मोरे यांनी काम पाहिले. तसेच या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. उत्तम बाबुराव शिंदे जिल्हा प्राथमिक शाळा आकाईचीवाडी तालुका - कराड आणि प्रा.संतोष नामदेव माडकर कराड नगरपरिषद शाळा क्रमांक ३ तालुका कराड यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम लवकरच आयोजित करण्यात येणार आहे असे सावली प्रतिष्ठान कडून प्रा. सुरेश यादव यांनी सांगितले.