कृष्णा कारखाना मतमोजणीत प्रारंभिक कल सहकार पॅनेलच्या बाजूने


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या रेठरे बुद्रुक तालुका कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीस काही वेळापूर्वी प्रारंभ झाला आहे. प्रारंभिक कल येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष निकालाकडे लागून राहिले आहे. 
 प्रारंभिक कलांमध्ये विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. पहिल्या फेरीत 1 ते 74 या क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. ही मतदान केंद्रे प्रामुख्याने कराड तालुक्यातील आहेत. या केंद्रांवर सहकार पॅनेलला आघाडी मिळाल्याचे दिसत आहे या निवडणुकीमध्ये क्रॉस व्होटिंगची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. मात्र सभासदांनी पॅनल टू पॅनल मतदान केल्याचे दिसत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सहकार पॅनेलला जादा मते मिळाल्याचे दिसत आहे. त्यानंतर संस्थापक पॅनल तर तिसर्‍या क्रमांकावर रयत पॅनल असल्याचे दिसत आहे.