कोयना धरणातून उद्या पाणी सोडणार

 


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
आज दि. 22 जुलै 2021 रोजी संध्या. 5 वाजता धरणाची पाणी पातळी 2133 फूट 2 इंच झाली असून धरणामध्ये 72.88 TMC पाणीसाठा झाला आहे.

धरणाची सांडवा पातळी 2133 फूट 6 इंच असून या पातळीस पाणीसाठा 73.19 TMC आहे.

पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे कोयना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे.

उद्या दि. 23 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 10000 क्युसेक्स विसर्ग सुरू करणेत येणार आहे. पाणलोट क्षेत्रामधून पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.