साळशिरंबे ग्रामपंचायतीला आॕक्सिजन मशीन भेट ; खा.श्रीनिवास पाटील फाऊंडेशन व प्राणवायू ग्रुपचा पुढाकार

साळशिरंबे : ग्रामपंचायतीला आॕक्सिजन मशीन भेट देताना तुकाराम पाटील, पै.तानाजी चवरे, धनाजी पाटील, सुरेश पाटील, रमेश पाटील, सुनिल चवरे, अभिजित चवरे आदी.

उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
खा.श्रीनिवास पाटील फाऊंडेशन व प्राणवायू ग्रुप तर्फे साळशिरंबे ग्रामपंचायतीला आॕक्सिजन काॕन्सनट्रेटर मशीन भेट देण्यात आले.      

साळशिरंबे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरण मोहीम सुरू असताना या मशीनचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम पाटील, काँग्रेसचे कराड दक्षिण चे प्रवक्ते पै.तानाजी चवरे, धनाजी पाटील, सुरेश पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष रमेश पाटील, उंडाळे येथील उदय पाटील, धोंडेवाडी येथील सचिन काकडे, सुनिल चवरे, सदाशिव नांगरे, भानुदास पाटील, बाळु कुंभार, उपसरपंच अभिजित चवरे, महेश पाटील, सागर विभुते, संतोष जाधव, आबासो चवरे आदी ग्रामस्थ तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॕ. संदिप नलवडे, आरोग्य सेवीका जंगम, आशा सेविका व त्यांचे सहकारी, ग्रामपंचायत कर्मचारी महादेव शिंदे, अजित साळुंखे उपस्थित होते.

   खा. श्रीनिवास पाटील व युवा नेते सारंग पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच श्रीनिवास पाटील फाऊंडेशन व प्राणवायु ग्रुप यांच्या सहकार्यातुन ग्रामपंचायत साळशिरंबे येथे आॕक्सिजन काॕन्सनट्रेटर मशीन देण्यात आले. सारंग पाटील यांनी साळशिरंबे येथे विकासकामांच्या निमित्ताने नुकतीच भेट देवून ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी पै.तानाजी चवरे यांनी गावातील विकासकामांच्या मागणीबरोबरच कोरोना काळात अनेक जणांना आॕक्सिजनचा तुटवडा जाणवल्याचे सांगून पाटील यांच्याकडे आॕक्सिजन मशीनची विनंती केली. त्याची दखल घेत त्यांनी खा.श्रीनिवास पाटील फाऊंडेशन व प्राणवायु ग्रुपच्या माध्यमातून तातडीने आॕक्सिजन मशीन उपलब्ध करुन दिले. मशीन उपलब्ध करण्यासाठी खा. पाटील यांचे साहेबांचे स्विय सहाय्यक दादासाहेब नांगरे, धोंडेवाडीचे सरपंच सचिन काकडे यांचे सहकार्य मिळाले.