कोरोनाला रोखण्यासाठी कुंभारगावकरांचा आठवडाभर जनता कर्फ्यू ; सर्व मुख्य रस्ते केले बंद.

 


कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :          
कुंभारगाव येथे कोरोनाने कहर केला असून कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे कुंभारगाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. वाढत्या कोरोना बाधित रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर कुंभारगाव ग्रामपंचायतिने आठवडाभर जनता कर्फ्यू पुकारला आहे. कुंभारगाव मधील सर्व मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत.
एप्रिल ते जुन 89 रुग्ण होते त्यातील 66 जणांनी कोरोनावर मात केली. ऍक्टिव्ह रुग्ण 16 होते तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 
जुन ते 10 जुलै अखेर एकूण 25 रुग्ण असून त्यातील 7 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे सद्यस्थिती 15 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

हे चित्र पाहून ग्रामपंचायत सतर्क झाली या पार्शवभूमीवर दि. 7/7/2021, रोजी तातडीची ग्रामसभा आयोजित केली. या ग्रामसभेत सरपंच सारिका पाटणकर, ग्रामसेवक अनिल जाधव, ग्रामपंचायत सदस्य महादेव वरेकर, तलाठी सपकाळ, पोलीस पाटील अमित शिंदे, प्रवीण मोरे, ग्रामस्थ, तरुण वर्ग यांच्या उपस्थित कुंभारगाव येथे सात दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवेतील सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला.

बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचे सर्वे करून टेस्टिंग करून कोरोना बाधित आढळल्यास त्यांचे विलगीकरण होणे गरजेचे आहे .अनेक नागरिक कोरोनाचे कोणतेही नियम पाळताना दिसत नाहीत विना मास्क सर्वत्र फिरत असतात. कोरोना बाधितांचे संपर्कातील लोकही गर्दीच्या ठिकाणी वावरत असतात त्यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक प्रमाणात होताना दिसत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे याकडे गांभीर्याने लक्ष देणे काळाची गरज आहे. 



खबरदारीचा उपाय म्हणून तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्रा कडून बाधित रुग्णाच्या संपर्कातील व विनाकारण फिरणाऱ्या लोकांची टेस्टिंग करण्यात आली हि मोहीम पुढेही चालू राहणार असून नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी ज्यांना त्रास होत असेल त्यानी टेस्टिंग करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.