मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के.नलिनाक्षन यांचा काल शुक्रवारी सकाळी मसीना रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यु झाला. ते ७९ वर्षांचे होते. नलिनाक्षण हे बुधवारी घरामध्ये देवपुजा करताना अचानक त्यांच्या धोतीला आग लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते.मात्र मसीना रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,नातवंडे आणि सून असा परिवार आहे.त्यांचा एक मुलगा हॉंगकॉंग येथे असतो.
नलिनाक्षन यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या मुलगा श्रीजीतने दिली आहे. के.नलिनाक्षन १९६७च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. ते कोझीकोड येथील मूळचे रहिवासी असून त्यांनी १९९९ ते २००१ या कालावधीत मुंबईचे आयुक्तपद सांभाळले होते. तसेच त्यांनी मंत्रालयात परिवहन आणि उत्पादन शुल्कचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. ते चर्चगेट येथील चार्लव्हील अपार्टमेंटमध्ये राहत होते.बुधवारी सकाळी देवपूजा करत असताना पेटत्या कापुरामुळे त्यांच्या धोतीला आग लागली . देवघराचा दरवाजा आतून बंद असल्याने ही घटना कुणाला लवकर समजली नाही.तसेच नलिनाक्षण यांनी पट्टा लावल्यामुळे त्यांना चटकन धोती सोडता आली नाही.ते ८० ते ९० टक्के भाजले होते.