यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ.

कराड  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्यासाठी सकाळी पावणे नऊ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ झाला आहे.दरम्यान, मतमोजणी केंद्रासह संपूर्ण कराड तालुक्यासह कारखाना कार्यक्षेत्रात अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कारखाना इतिहासात प्रथमच मतदान केंद्रनिहाय मतमोजणी दोन फेर्‍यात मतमोजणी होत आहे. सत्ताधारी सहकार पॅनेल आणि विरोधी रयत आणि संस्थापक पॅनेलमध्ये चुरशीची तिरंगी लढत होत असून मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार? याबाबत मोठी उत्सुकता आहे.