आंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पाटण तालुक्यातील मोरणा विभागात आंबेघर येथे गुरवारी मध्यरात्री गावावर दरड कोसळली. गावातील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. तीन कुटुंबे बेपत्ता झाली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मदतकार्यास सुरवात झाली आहे. मात्र पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून व पाण्याखाली गेल्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासकीय यंत्रणा देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. एनडीआरएफ च्या टिमला या ठिकाणी प्राचारण करण्यात आले आहे.                 दरम्यान पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. पाटण तालुक्यात आंबेघर, ढोकावळे, मोरगिरी, कामरगाव, गुंजाळी, काठेवाडी (घेरादात्तेगड), टोळेवाडी, कातवडी-मेष्टेवाडी आदीसह अनेक ठिकाणी डोंगर-दरडी ढासळले आहेत.


Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज