चेंबूरमधील कोरोना लसीकरण केंद्राला ना.आदित्य ठाकरे यांची "सरप्राईज" भेट

 मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : चेंबूरमधील सेंट अँथनीज गर्ल्स हायस्कूल येथे चेंबूर सिटीझन्स वेल्फेअर या अग्रगण्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राला युवा सेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण ,पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी "सरप्राईज ' देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास चेंबूरमध्ये प्रवेश करत चेंबूर सिटीझन्स वेल्फेयर असोसिएशनच्या प्रमुख आणि माजी नगरसेविका सुप्रदा फातर्फेकर यांना अचानक फोन करून सांगितले की मी चेंबूरमध्ये आलोय आणि तुमच्याकडे येतोय.सुप्रदा यांनी मोबाइलवर थेट मंत्री आदित्य ठाकरे हे बोलत असल्याचे पाहून त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला .त्यांना क्षणभर काय बोलावे सुचेनासे झाले. त्यानंतर काही मिनिटातच आदित्य ठाकरे हे प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर दाखल झाले . यावेळी शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रकाश फातर्फेकर आणि सुप्रदा फातर्फेकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी लसीकरण केंद्रावरील प्रत्यक्ष कामकाज पाहून समाधान व्यक्त करत सुप्रदा फातर्फेकर आणि चेंबूर सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशनच्या आजवरच्या कामाचे दाखले देत त्यांचे कौतुक केले.या "सरप्राईज" भेटीवेळी असोसिएशनचे पदाधिकारी ,सेंट अँथनी गर्ल्स हायस्कुलचे प्रमुख पदाधिकारी ,शिक्षक आणि विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
कुंभारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी भरवला बाजार
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : गुलाबराव जगताप
इमेज