पाटणमध्ये चोरीची मोटारसायकल हस्तगत.

 


पाटण  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : रात्रगस्त करणाऱ्या पोलिसांनी संशयास्पदरित्या शहरातून फिरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून चोरीची मोटारसायकल हस्तगत केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार शरद रामचंद्र घाडगे वय-३७ वर्षे, व्यवसाय शेती, रा. म्हावशी यांनी त्यांच्या मालकीची बजाज कंपनीची डिस्कवर मोटर सायकल क्र. एम. एच. ११ बी. पी. २१८८ ही दि. १९ रोजी दुपारी १ च्या सुमारास येथील जुनी ग्रामपंचायत परिसरात लावली असता अज्ञात चोरटयाचे चोरल्याची फिर्याद दिली होती. दि. २७ रोजी पहाटे ५ च्या सुमारास ठाणे अंमलदार पगडे, पोलीस शिपाई मोरे शहरात रात्रगस्त करत असताना त्यांना २ इसम बजाज कंपनीची डिस्कवर गाडी क्रमांक एम. एच. ११ बी. पी. २१८८ वरून प्रवास करत असताना मणदुरे फाटा येथे संशयीतरित्या आढळले. त्यांच्याकडे एम. एस. मोरे यांनी वाहन चालविण्याचा परवाना, कागदपत्रांबाबत चौकशी केली असता काहीही मिळुन आले नाही व ते उडवा उडवीची उत्तरे देत होते. त्यांना मोटर सायकलसह पाटण पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले असता ते वाहन चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपी देवेंद्र विठ्ठल क्षेत्री वय-२४ वर्षे, रा. मत्यापुर, ता. सातारा, महावीर ऊर्फ सचिन सोमाजी पवार वय-३२ वर्षे, सध्या रा. दत्तनगर, कोडोली ता. सातारा, (मुळ गाव व्हनाळी ता.कागल जि. कोल्हापुर) यांना अटक करून येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांनी आरोपींना २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पगडे अधिक तपास करत आहेत.