येळगांव व म्हासोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे भरण्यास शासनाची मंजुरी

ॲड.उदयसिंह पाटील यांची माहिती

उंडाळे  | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कराड दक्षिण डोंगरी विभागातील येळगांव व म्हासोली या दोन्ही ओरोग्य केंद्राच्या आकृत्ती बंधानुसार पद निर्मितीस शासनाच्या सार्वजनिक ओरोग्य विभागाने मंजुरी दिली असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य ॲड.उदयसिंह पाटील यांनी दिली.

ॲड.उदयसिंह पाटील माहिती देताना पुढे म्हणाले, दक्षिण डोंगरी विभागातील जनतेला चांगल्या ओरोग्य सेवा मिळाव्यात या हेतुतून माजी मंत्री स्व.विलासराव पाटील यांनी येळगांव व म्हासोली ओरोग्य केंद्रांना मंजुरी घेतली होती. दोन्ही आरोग्य केंद्राची बांधकामे पूर्ण झाली असून ही आरोग्य केंद्रे पद निर्मितीच्या प्रतिक्षेत होती.माजी मुख्यमंत्री,आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रयत्नातून अखेर ओरोग्य केंद्रातील पदे भरणेस मंजुरी मिळाल्याने लवकरच ओरोग्य केंद्र रुग्णसेवेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्येक ओरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकारी यांच्या दोन पदासह १५ पदे भरली जाणार आहेत.

 येळगांव व म्हासोली प्राथमिक ओरोग्य केंद्रामुळे कोविड १९च्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण डोंगरी विभाग ओरोग्य सेवेत परिपूर्ण होणार आहे.लवकरच ही दोन्ही ओरोग्य केंद्र सुरू होतील. या विभागात स्व.विलासकाकांच्या दूरदृष्टी मुळे एक ग्रामीण रुग्णालय,तीन प्राथमिक आरोग्य केंद्र, सहा ओरोग्य उपकेंद्र असून लवकरच जिंती-अकाईची वाडी, मनव, तुळसण, गोटेवाडी येथे उपकेंद्रे मंजूर असून ती ही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. उंडाळे ग्रामीण रुग्णालयात ३० बेड चे कोविड सेंटर सुरू केले असून शासनाच्या निधीतून सुमारे १ कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लान्ट उभा करण्याचे काम सुरू आहे. शासन व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे सहकार्यातून ग्रामीण रूग्णालया साठी कार्डियाक रुग्णवाहिका, उपकरणे, औषधें व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याचे उदयसिंह पाटील यांनी सांगितले.