गावचे ऐक्य व कामाची आत्मीयता असेल तर यश नक्की मिळते याचे आदर्श उदाहरण म्हणजे बनपुरी : योगेश टोंपे

सणबुर | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  कोणतेही काम आत्मीयतेने केल्याने या मध्ये यश नक्की मिळते हे बनपुरी गावातील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे असे प्रतिपादन पाटण तालुक्याचे तहसीलदार योगेश टोंपे यांनी केले

       ते बनपुरी ता पाटण गाव ने श्री नाईकबा विद्यालयात झीरो बजेट मध्ये निर्माण केलेल्या करोना १९ विलगीकरण कक्षांचे उदघाटन प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

यावेळी पोलीस निरीक्षक चौंखडे साहेब, डॉ पूनम शिंदे, सरपंच नर्मदा कुंभार, मा उपसरपंच डॉ शिवाजीराव पवार,उपसरपंच अशोकराव जगदाळे,अशोक पाटील सर, डॉ गणेश पवार,अभय पवार, ग्रामसेवक तानाजी जाधवर, गावकामगार तलाठी धनंजय डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

        यावेळी बोलताना तहसीलदार योगेश टोंपे म्हणाले की काही दिवसांपूर्वी बनपुरी गाव पाटण तालुक्यात कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते ते ग्रामस्थांनी एक महिन्या मध्ये कोरोनामुक्त गाव केले असून ग्रामस्थांनी झीरो बजेट चे ढेबेवाडी विभागातील मोठे चाळीस बेड चे करोना १९ विलगीकरण कक्ष उभे केले आहे. बनपुरी गावामध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी ग्रामस्थांनी व आरोग्य विभागाने दक्ष राहावे असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

        यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ पूनम शिंदे यांनी या विलगीकरण कक्षाला आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सुविधा ची माहिती दिली. बनपुरी गावातील ग्रामस्थांनी सुद्धा विलगीकरण कक्षाला लागणारे साहित्य दिले आहे यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाब्दिक स्वागत विनायक लटके सर यांनी केले प्रस्ताविक डॉ शिवाजीराव पवार यांनी केले आभार प्रमोद पाटील यांनी मानले.