ढेबेवाडी पोलिस व आरोग्य विभागा मार्फत कोरोना रोखण्यासाठी मोठी मोहीम ; विनाकारण फिरणाऱ्यांची ऑन द स्पॉट कोविड टेस्ट.

 


छाया : महेश कचरे , कलासंगम फोटो 

तळमावले | राजेंद्र पूजारी :
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत असताना बहुतांशी नागरिकांना मात्र आरोग्याची फारशी काळजी नसल्याचे दुर्दैवी चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे.

लॉकडाऊन मध्ये शासनाने थोडी शिथिलता दिल्या नंतर ढेबेवाडी विभागातील ग्रामस्थ विनाकारण बाजारपेठ व रस्त्यावर फिरत असल्याचे ढेबेवाडी पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर ढेबेवाडी पोलिसांनी आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांची मदत घेऊन ढेबेवाडी बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर कोरोना चाचणी कॅम्प आयोजित केला व विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कोरोना टेस्ट केली. हा प्रकार लक्षात येताच विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले व ते भीतीने घराकडे पळू लागले. 

आज ढेबेवाडी येथे सुरू केलेल्या कोरोना चाचणी मोहिमेत 82 विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली  यामध्ये 42 नागरिकांची अँटीजेन चाचणी करण्यात आली यामध्ये सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 40, जणांची RTPCR टेस्ट करण्यात आली याचा रिपोर्ट 2 दिवसांनी मिळेल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

ग्रामीण विभागात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, मंगळवार ढेबेवाडीचा बाजार अनेक दिवसापासून बंद आहे परंतु काही वेळा प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून बाजार भरवण्याचा प्रयत्न होत होता, परंतु ग्रामपंचायत व प्रशासनाने कारवाई करून हा बाजार पूर्णपणे बंद केला. तरीसुद्धाअनेक नागरिक बेपर्वाई पणे विनाकारण बाजार पेठेत फिरत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्र व ढेबेवाडी पोलीस स्टेशन यांचे संयुक्त विध्यमाने बाजरपेठेच्या मुख्य रस्त्यावर टेस्टिंग कॅम्प घेण्यात आला व कोरोना रोखण्याची ही मोहीम राबवण्यात आली.   

ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, हेड कॉन्स्टेबल नवनाथ कुंभार, पोलीस कर्मचारी अजय माने, संदेश लादे, एम ए पवार, पोलीस नाईक प्रशांत नाईक, अशोक खवले, होमगार्ड तसेच आरोग्य विभागाकडून सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी डॉ. एस.डी.जाधव, आरोग्य सेवक दत्तात्रय शिंदे, टेक्निशियन एस एस चोपडे, NPW, संदीप साळुंखे, CHO डॉ कोमल लोकरे, नर्स मेघा शिंदे, करवते बी एस, असिस्टंट कांता बर्डे, शंतनू पाटील, गटप्रवर्तक अदिती थोरात आदींनी या कॅम्प मध्ये सहभाग घेतला.           

काढणे येथेही कोरोना टेस्टिंग कॅम्प  :  
तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्रा कडून काढणे येथे कोरोना कॅम्प घेण्यात आला यामध्ये एकूण 25 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यात सर्व निगेटिव्ह निघाले या कॅम्प मध्ये तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ यू. जी. गोजारी, आरोग्य सेवक रोहीत भोकरे, आरोग्य साहयक एस, आर परीट, पावरा, ग्रामसेवक बी एस पवार, सरपंच आदींनी सहभाग घेतला.

ढेबेवाडी पोलीस व आरोग्य विभागामार्फत कोरोना रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या धडक मोहिमेचा धसका ढेबेवाडी भागातील नागरिकांनी चांगलाच घेतला आहे. त्यामुळे ढेबेवाडीकरांनो विनाकारण रस्त्यावर फिरू नका अन्यथा ढेबेवाडी पोलिसांची करडी नजर आपल्यावर आहे याचे भान ठेवा.