राज ठाकरे यांचा लाडका श्वान "जेम्स"चे निधन


मुंबई  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे श्वानप्रेम सर्वांनाच माहीत आहे.मात्र राज ठाकरे यांचा लाडका श्वान जेम्सचे निधन झाले आहे.जेम्सने काल सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.जेम्स हा ग्रेट डेन प्रजातीचा होता आणि गेले कित्येक वर्ष तो राज ठाकरेंच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे राहत होता.जेम्सचे अचानकपणे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्वांनाच एक प्रकारे भावनिक धक्का बसला आहे.

राज ठाकरे अनेकदा बाहेर जातना जेम्सला सोबत घेऊन जात असत. राज ठाकरे यांच्याकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. त्यापैकी बॉन्ड आणि शॉन या श्वानांचे यापूर्वीच निधन झाले होते. जेम्सला अखेरचा निरोप देताना अमित ठाकरे हे सुध्दा भावुक झाले होते.

Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज