कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांना फायदेशीर : योगेश टोम्पे

 


फळबाग लागवड शुभारंभ करताना योगेश टोम्पे, सुनील ताकटे व अन्य.

पाटण  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कृषी विभागाच्या शेततळे, फळबाग लागवड, गांडुळखत युनिट इत्यादी योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक असून तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन तहसीलदार योगेश टोम्पे यांनी केले.

कृषी विभागाच्यावतीने कृषी संजीवनी मोहिमेनिमित्त काठी येथे आयोजित फळबाग लागवड व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, काठी सारख्या दुर्गम भागांमध्ये कृषी विभागाच्या योजना पोहोचत असून त्या राबवत असताना शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, तंत्र अधिकारी दत्तात्रय खरात, तालुका कृषी अधिकारी सुनील ताकटे, कृषी सहाय्यक नितीन लोखंडे, कर्चे, सरपंच व शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमात दौलत चव्हाण, दत्तात्रय खरात यांनी मार्गदर्शन केले. संजय दीक्षित यांनी प्रास्ताविक केले तर नितीन लोखंडे यांनी आभार मानले.