डाॅ.संदीप डाकवें ची ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ ने घेतली तिसर्‍यांदा दखल

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ या अखिल भारतीय विश्वविक्रमांची नोंद घेणार्‍या पुस्तकाने डाॅ.संदीप डाकवे यांची तिसर्‍यांदा दखल घेतली आहे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून त्यांची 54 चित्रे काढून त्याची फ्रेम ना.देसाई यांना भेट दिली होती. त्यानंतर डाॅ.डाकवे यांनी ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ कडे पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेतल्याचा मेल डाॅ.संदीप डाकवे यांना नुकताच प्राप्त झाला आहे. काही दिवसातच यासंबंधीचे प्रमाणपत्र, मेडल, पुस्तक इ.गोष्टी मिळणार आहेत.

यापूर्वी जास्तीत जास्त मान्यवरांना चित्रे भेट देणे, मराठी संपादकाला त्याच्या वयाइतकी चित्रे भेट देणे अशा दोन अनोख्या उपक्रमांची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झाली आहे. सर्वसामान्य कुटूंबातील या जिद्दी युवकाने ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ या पुस्तकात तीनदा नाव नोंदवत आपल्या कर्तबगारीचा झेंडा रोवला आहे. त्यामुळे डाॅ.संदीप डाकवे यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत नावीण्यपूर्ण उपक्रमाबरोबर जपलेली सामाजिक बांधिलकी अभिमानास्पद आहे. कलेच्या माध्यमातून राबवलेल्या उपक्रमातून सुमारे रु.85 हजारपेक्षा जास्त रकमेची मदत गरजूंना केली आहे.

साहित्य, पत्रकारिता आणि चित्रकारिता यामध्ये डाॅ.डाकवे करत असलेली प्रगती कौतुकास्पद आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून 4 पुरस्कार तर इतर संस्थांनी सुमारे 50 हून अधिक पुरस्कार प्रदान केले आहेत. तसेच त्यांची 4 पुस्तके प्रकाशित झाली असून 6 पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. डाॅ.डाकवे यांनी आतापर्यंत 7,000 पेक्षा जास्त दिग्गज व्यक्तिंना त्यांची चित्रे भेट दिली आहेत. याशिवाय एक डाॅक्युमेंटरीदेखील प्रदर्शित झाली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज, सेलिब्रिटी यांनी डाॅ.डाकवे यांचे तसेच ते राबवत असलेल्या उपक्रमांचे जाहीर कौतुक केेले आहे. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून त्यांनी राबवलेले उपक्रम दिशादर्शक आहेत.

डाॅ.संदीप डाकवे यांच्या आतापर्यंतच्या कार्याची दखल प्रिंट मिडीया तसेच इलेक्ट्राॅनिक मिडीयाने घेतली आहे. चित्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधन केले आहे. शिवाय अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे देखील साकार केली आहेत. दिवाळी अंक, गौरव ग्रंथ, विशेषांक यांचे संपादन केले आहे. वृत्तमानपत्रातून 500 पेक्षा जास्त पत्रांचे लेखन केले आहे. सध्याच्या सोशल मिडीयाच्या युगात विविध मान्यवरांच्या पत्रांचा सग्रह अतिशय कल्पकतेने जपला आहे. 11 पेक्षा जास्त हस्तलिखिते तयार केली असून 12 पेक्षा जास्त मान्यवर सेलिब्रिटींच्या मुलाखती प्रसिध्द केल्या आहेत.

डाॅ.डाकवे यांनी शासकीय योेजनांची प्रसिध्दी, हस्तलिखीते, कात्रण प्रदर्शने, भित्तीपत्रिका प्रदर्शन, पोस्टर प्रकाशन, जनजागृती करुन त्यांनी आपले वेगळेपण जपले आहे. खडूवर अष्टविनायक, मोरपिसावर संत तुकाराम, जाळीदार पिंपळाच्या पानावर श्री गणेश, अक्षरगणेश, ठिपके, स्क्रिबलिंग, शब्दातून चित्रे रेखाटली आहेत. वारी व जवान यांचे 15 फुट कॅलिग्राफी, घराच्या भिंतीवर वारी व जवानांचे चित्र असे कलात्मक उपक्रम राबवले आहेत. तसेच व्यंगचित्रे, मास्क, छत्री इ.मधून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक शाळांच्या बोलक्या भिंती विनामुल्य रेखाटल्या आहेत. ‘प्राईड ऑफ स्पंदन’ या पुरस्कार सोहळयातून समाजातील गुणवंताना गौरवले आहे.

डाॅ.संदीप डाकवे यांच्या एकंदरित वाटचालीबद्दल परिसरातून कौतुक होत आहे. या निवडीबद्दल डाॅ.संदीप डाकवे यांचे शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार जनार्दन बोत्रे, प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे, प्रा.ए.बी.कणसे, बाळासाहेब कचरे, जयंत कदम, एन.बी.परीट, सुरेश जाधव, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 
_________________________________________
महाराष्ट्र शासनाचे 4 पुरस्कार प्राप्त
हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड पुस्तकात नोंद
विविध संस्थांचे 50 हून अधिक पुरस्कार
खसखस वेबपेज कडून दखल
7000 पक्षा जास्त दिग्गजांना चित्रे भेट
_________________________________________