चेंबूरच्या बालवाडी नूतनीकरण वास्तूचे उद्घाटन व स्मारक अनावरण संपन्न

 


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील संभाजीनगर येथे बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आणि वॉर्ड क्रमांक १५३ चे स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या नगरसेवक निधीतून छत्रपती रहिवासी मंडळाच्या बालवाडीच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचा उद्घाटन व छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा अनावरण सोहळा नुकताच पार पडला. 

सदर कार्यक्रमप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, विभागप्रमुख व नगरसेवक मंगेश सातमकर, आमदार प्रकाश फातर्फेकर, महिला विभाग संघटिका रिता वाघ, नवाकाळ उपसंपादक शंकर कडव, चेंबूर विधानसभा संघटक अविनाश राणे, शाखाप्रमुख उमेश करकेरा, महिला शाखा संघटीका अनिता महाडिक, समाजसेविका मिनाक्षी पाटणकर, कार्यालय प्रमुख मारूती वाघमारे, चेंबूर विधानसभा समन्वयक गणेश गायकवाड,युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये,शिवसेना - युवासेना महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना नियमांचे पालन करत पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी गणेश मिरगुले यांनी केले.शेवटी छत्रपती रहिवाशी मंडळाचे अध्यक्ष अरविंद घाग यांनी उपस्थितांचे आभार मानले.