नगरसेवक अनिल पाटणकरांच्या प्रयत्नाने चेंबुरमध्ये नवे उद्यान सुरू

 


मुंबई |कृष्णाकाठ वृत्तसेवा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आणि राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत बेस्टचे माजी अध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर यांनी चेंबूरच्या वार्ड क्रमांक १५३ मध्ये भरपावसात वृक्षारोपण करत नवीन उद्यानाची उभारणी केली आहे.

चेंबूरमधील अतूर पार्क येथील ट्विक्कल स्टार सोसायटीच्या पाठीमागील बाजूस या नव्या उद्यानाची सुरुवात करण्यात आली आहे.या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, शाखा प्रमुख उमेश करकेरा ,चेंबूर विधानसभा संघटक अविनाश राणे, लोकप्रिय समाजसेविका मीनाक्षी पाटणकर ,कार्यालय प्रमुख मारुती वाघमारे , युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये , फोकस फेडरेशनचे अध्यक्ष प्रसादसेन गुप्ता,शिवसेना महिला,पुरुष पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.