चेंबूर परिसरात ढगफुटी , सर्व नाले तुडूंब , उद्याने बनले तलाव , घराघरांत पाणी

मुंबई  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : यंदाच्या पावसाळ्याचा पहिलाच दिवस मुंबईकरांना मोठा त्रासदायक ठरणारा गेला .चेंबूर परिसरात तर दुपारच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. सर्व मोठे नाले ,छोटी गटारे तुडुंब भरून वाहु लागली. २००५ सालातील २६ जुलैच्या विध्वंसक पावसानंतर पहिल्यांदाच अनेकांच्या घरांत पाणी शिरले होते.

चेंबूरमधील घाटले गाव परीसरातील आनंदनगर , संभाजीनगर , मुक्तीनगर , दादोजी कोंडदेव नगर , नागेश पाटील वाडी , साईधाम रहिवासी संघ , घाटले गाव मैदान परिसर आणि सुभाषनगर भागात मुसळधार पाऊस कोसळला. वॉर्ड क्रमांक १५३ मध्ये येणार हा परिसर अक्षरशः जलमय झाला होता . सुदैवाने यात कुठेही जीवितहानी हानी झाली नाही. मात्र घराघरांत पाणी शिरल्याने अनेकांचे संसारोपयोगी सामान भिजले. स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर हे स्वतः रस्त्यावर उतरुन आपल्या कार्यकर्त्यांसह अनेक ठिकाणच्या जलमय भागाची पाहणी करताना दिसत होते. हे कार्यकर्ते अनेकांच्या घरातील पाणी उपसायला मदत करत होते.