वॉन्टेड आरोपीला गोवंडी पोलिसांनी गोरेगावातून शिताफीने पकडले

मुंबई  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : दुसऱ्याच्या बँक खात्यातून लाखो रुपये आपल्या नावावर परस्पर ट्रान्सफर करून फसवणूक करणाऱ्या वॉन्टेड आरोपीला गोरेगाव परिसरातून मोठया शिताफीने पकडण्याची कामगिरी गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे आणि पोलीस निरीक्षक इडेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संपत नाळे यांनी त्यांच्या पोलीस पथकाने केली आहे.

गोरेगाव पश्चिमेला असलेल्या मोनीलाल नगर परिसरतून अटक केलेल्या या वॉन्टेड आरोपीचे नाव संपत नरसिंहा गौड (३८)असे असून त्याने एका इसमाच्या बँक खात्यातील सुमारे साडेतीन लाख रुपये परस्पर आपल्या खात्यावर वळवून मोठी फसवणूक केली होती. हा आरोपी गेल्या काही महिन्यांपासून आपले मोबाईल लोकेशन बदलून गोवंडी पोलिसांना गुंगरा देत होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस पोलीस अधिकारी केदारे आणि पोलीस निरीक्षक इडेकर मॅडम यांनी पोलीस उपनिरीक्षक संपत नाळे आणि पोलिस नाईक चव्हाण व हंबीर यांचे खास पथक बनवून याकामी लावले.त्यांनतर मिळालेल्या खबरीवरून या पोलीस पथकाने वॉन्टेड आरोपीला मोठ्या शिताफीने त्याच्या गोरेगावच्या घरातून पकडून गोवंडी पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणाचा पुढील तपास तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक इडेकर मॅडम या स्वतः करत आहेत.

Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसहकार पतसंस्थेच्या वतीने जिजाऊ वस्तीगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज