भागिर्थी पाटील ट्रस्ट व फौंडेशनकडून पोलिसांना आधार.

 कराड : पाण्याच्या बॉटलचे बॉक्स स्विकारताना पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील 

कराड  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मलकापूर येथील भागिर्थी  पाटील ट्रस्ट व फौंडेशनकडून कोरोना काळात जीव धोक्यात घालून सामान्यांच्या आरोग्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्याकडे ट्रस्टचे अध्यक्ष संभाजी शेवाळे, संजय मस्कर व चंद्रजीत पाटील यांनी पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स सुपूर्द केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही तत्कालीन पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्याकडे सुमारे २०० पोलिसांसाठी अत्यावश्यक कीट सोपवण्यात आले होते.

भागिर्थी  पाटील ट्रस्ट व फौडेंशनच्या या सामाजिक कार्याचे पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी कौतुक केले आहे.

Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज