चाटे शिक्षण समुहाची कु. श्रेया बनकर राष्ट्रीय स्तरावरील एनटीएसई परीक्षेसाठी पात्र
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
एनटीएसई २०२० राज्य स्तरावरील स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. या परीक्षेमध्ये चाटे शिक्षण समुहाच्या कु.श्रेया रमेश बनकर या विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावरील एनटीएसई परीक्षेसाठी पात्र होण्याचा मान मिळविला. इयत्ता दहावीमध्ये शिकत असताना नॅशनल टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षा देता येते. 

या स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतोच पण भविष्यातील स्पर्धा परीक्षांची पायाभरणीही होते. अशा परीक्षेमध्ये श्रेयाने मिळवलेले यश कौतुकास पात्र आहे. श्रेयाचा आदर्श घेवून इतर विद्यार्थ्यांनीही असे यश मिळवण्यासाठी परिश्रम घ्यावेत असे सत्कारप्रसंगी प्रा.डॉ. भारत खराटे यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना कु. श्रेया बनकर या विद्यार्थीनीने उच्च ध्येय ठेवून योग्य मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनानुसार घेतलेल्या परिश्रमाला यश मिळतेच. आजचे यश योग्य मार्गदर्शन आणि पालकांनी दिलेले प्रोत्साहन आणि विश्वास यामुळेच शक्‍य झाल्याचे सांगितले.

श्रेयाने मिळविलेल्या उज्ज्वल यशाबद्दल चाटे शिक्षण समुहाचे अध्यक्ष प्रा. गोपीचंद चाटे, सर्व शिक्षक मार्गदर्शक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकांनी तिचे अभिनंदन केले.

Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज