विकास शिरसठ यांच्या वाढदिवसानिमित्त ॲड.जनार्दन बोत्रे यांच्या हस्ते मल्लांना बदाम वाटप .

 


शिराळा  | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

कुस्ती मल्लविद्या महासंघ शिराळा तालुका प्रवक्ते विकास शिरसठ यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी येथे दहा किलो बदाम वाटप केले. सदर कार्यक्रमावेळी शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन ॲड.जनार्दन बोत्रे यांच्या हस्ते मल्लांना बदामाचे वाटप केले.

शिराळा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरात कुस्ती मल्लविद्या महासंघाचे बहुतांशी पदाधिकारी या कोरोनासारख्या कठिण काळात गोरगरीब मल्लांना खुराकाचे वाटप करत आहेत. त्याचबरोबर शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील सर्वच पदाधिकारी नेहमीच मल्लविद्या कुस्ती केंद्रातील सर्वच मल्लांना अशा पद्धतीने खुराकाची सोय करतात.विकास आण्णा शिरसठ तर मल्लविद्या कुस्ती केंद्र स्थापन झाल्यापासून दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त खुराक देतात. गतवर्षी त्यानी दहा किलो तुप दिले तर यावर्षी दहा किलो बदाम दिले. खरोखरच अशी दानतदार मंडळी समाजात आहेत म्हणून आपली लाल मातीची कुस्ती अखंडपणे टिकून आहे. 

 या कार्यक्रमावेळी शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन ॲड.जनार्दन बोत्रे, कोल्हापुर जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघ अध्यक्ष आनंदराव पाटील (मिस्ञी) , कुस्ती मल्लविद्या महासंघ शिराळा तालुका प्रवक्ते विकास शिरसठ, शिवाजी सुर्वे , पै.पाटील महाराज कुठरेकर, नितीन पाटील, शांताराम ताईंगडे आणि कुस्ती केंद्रातील सर्व मल्ल उपस्थित होते .