वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन काळाची गरज: प्राजक्ता जोहरी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेमध्ये वृक्षारोपण संपन्न.

 

वृक्षारोपण करताना संस्थेचे सचिव श्री.प्रसून जोहरी, ट्रस्टी प्राजक्ता जोहरी सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, समवेत कु.सारा व इरा.

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  

सध्याच्या काळात वृक्षारोपण काळाची गरज आहे रस्ते विकास व इतर डेव्हलपमेंटच्या नावाखाली शेकडो झाडे तोडली जातात तेवढ्या प्रमाणात वृक्षारोपण होत नाही त्यामुळे झाडांची संख्या कमी होत आहे. जंगले ही कमी होत आहेत त्याचा परिणाम जनजीवनावर होत आहे.

असे प्रतिपादन श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या ट्रस्टी प्राजक्ता जोहरी यांनी केले. घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेत नुकतेच त्यांच्या हस्ते व संस्थेचे सचिव श्री. प्रसून जोहरी सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी,डी फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली महाडिक, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या पुष्पा पाटील, इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सुप्रिया पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी पुढे बोलताना प्राजक्ता जोहरी म्हणाल्या कोरोना काळात वृक्ष व वृक्षापासून मिळणारा ऑक्सिजन व मानवी जीवनातील ऑक्सिजन चे महत्त्व सर्व जगाला समजले आहे. त्यामुळे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे.

   दरवर्षी जूनमध्ये श्री संतकृपा शिक्षण संस्था संस्थेच्या प्रांगणात, मैदाना भोवती वृक्षारोपण करत असते. मागील पाच वर्षात साधारण 500 झाडांचे वृक्षारोपण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. व त्या सर्वच्या सर्व वृक्षांचे संवर्धनही केले आहे.

   यावेळी कोरोना चे नियम पाळून शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.