" निमित्त वाढदिवसाचे स्वच्छता प्राथमिक शाळेच्या परिसराची." ढेबेवाडी येथील युवकांनी वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी.

 


ढेबेवाडी  | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
ढेबेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त येथील प्राथमिक शाळेच्या आवारातील साफसफाई करण्यात आल्याने शाळा परिसराचे रूपडे पालटले आहे. गत चार महिन्यापासून शाळा बंद असल्याने येथील प्राथमिक शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडेे झुडपे उगवल्याने शाळा परिसरात अवकळा पसरली होती.14 जुन रोजी शिक्षकांनी शाळेचे दरवाजे खुले केले आहेत त्या पार्श्वभूमीवर गावातील काही युवकांनी सामाजिक कार्यकर्ते शंकर चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा परीसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली परीसरातिल झाडे झुडपे, गवत, दगड हटवून ट्रॅक्टर ब्लेड च्या साहाय्याने जमिनीची लेवल करण्यात आली . सुमारे तीन तास ही मोहीम राबवण्यात आली. शाळा परिसराची स्वच्छता केल्याने शाळेचे जणू रुपडेच पालटले आहे. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे या स्वच्छता अभियानात सोमनाथ पाटील, अभिजीत कडव, शंकर चौधरी, सतीश आलेकर, सतीश फल्ले, रविकांत रेडीज,  नितीन बेलागडे, संतोष कदम, अभिजीत शेटे, संतोष शेटे, बाबु बेलवनकर व वरद पानारी यांनी सहभाग घेतला होता.