नगरसेवक पाटणकरांच्या प्रयत्नाने चेंबूरमध्ये लसीकरण केंद्र सुरू ; महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते लोकार्पण

 


मुंबई  | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  बेस्टचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने चेंबूरमधील घाटले म्युनिसिपल शाळेत नुकतेच कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचे लोकार्पण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की ,जर भविष्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर तिचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी मुंबई महापालिका पूर्णपणे तयार आहे.त्यासाठीच आम्ही मुंबईत १०० टक्के लसीकरण मोहीम राबविण्याची मोहीम हाती घेतली आहे.यावेळी शिवसेना उपनेते सुबोध आचार्य,स्थानिक आमदार प्रकाश फातर्फेकर ,महिला विभाग संघटिका रिता वाघ, चेंबूर विधानसभा संघटक अविनाश पांचाळ, माजी नगरसेविका सुप्रदा फातर्फेकर, कामिनी शेवाळे,

महिला शाखा संघटिका अनिता महाडिक, पालिका सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण, युवासेना विभाग अधिकारी सचिन खेतल,युवा सेना शाखाधिकारी विनय शेट्ये ,युवती शाखाधिकारी कविता यादव,कार्यालय प्रमुख मारुती वाघमारे आणि फोकस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसादसेन गुप्ता ,देवनार लायन्स क्लबचे पदाधिकारी व स्थानिक शिवसेना महिला, पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.