‘स्पंदन कवी मनांचं’ या काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याचे आवाहन

 


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
‘स्पंदन कवी मनांचं’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याचे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे. प्रथम नाव नोंदवलेल्या 51 कवींना यात प्राधान्य देण्यात येणार आहे. कवितेसोबत कविचे पूर्ण नांव, पत्ता, आयडेंटी फोटो, जास्तीत जास्त 5 ओळींमध्ये स्वतःबद्दलची माहिती पाठवावी. कवितेचा विषय शेतकरी, शेती यासंबंधी असावा. इंग्रजी आद्याक्षरांप्रमाणे आडनावातील पहिल्या अक्षरानुसार कवितेंचा क्रम असेल. प्रत्येक कविला सदर काव्यसंग्रहाच्या 10 प्रती व आकर्षक सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी रु.500/- मुल्य असणार आहे. हे मुल्य संदीप राजाराम डाकवे, आयडीबीआय बॅंक शाखा कुंभारगांव, खाते क्रमांक. 0625104000046844 या खात्यावर किंवा 9764061633 या क्रमांकावरती गुगल पे वरती पाठवावे.

विषेश म्हणजे या उपक्रमातून जमलेल्या रकमेपैकी काही रक्कम शेतकरी बांधवांसाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे आपण पाठवलेल्या कविता प्रसिध्द तर होतीलच परंतू गरजूंना मिळालेल्या मदतीमुळे त्याचे मुल्य देखील वाढणार आहे. तरी या उपक्रमांसाठी कविंनी आपल्या किमान 30 ओळीपर्यंतच्या 2 कविता डाॅ.संदीप डाकवे मो. 9764061633., प्रा.ए.बी.कणसे मो. 9822230212 या मोबाईल क्रमांकावर व्हाॅटसअप कराव्यात किंवा sandeepdakve@gmail.com या ईमेल वरती सोमवार दि.21 जून, 2021 अखेर पाठवाव्यात.

सदर काव्यसंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र कृषी दिनी गुरुवार दि.1 जुलै, 2021 रोजी शेतकरी बांधवांच्या हस्ते शेताच्या बांधावर करण्याचे नियोजन केले आहे. हा एक आगळावेगळा उपक्रम आहे. तरी या उपक्रमात जास्तीत जास्त कविंनी सहभाग व्हावे असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे.