पाटण तालुक्यातील रिक्त अंगणवाडी पदे भरणार : विभुते

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

पाटण  तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस अशी एकूण ४३ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुकांनी आवश्यक त्या कागदपत्रासह आपले अर्ज दाखल करावेत, असे आवाहन तालुका एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी व्हि.बी. विभुते यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

पत्रकात ते म्हणतात, या रिक्त पदांसाठी २८ जूनपर्यंत संबंधित कार्यालयात विनामूल्य अर्ज वितरित केले जातील व २ जुलैपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. ५ जुलै रोजी प्राप्त अर्ज जाहीर करण्यात येतील व ६ ते ८ जुलै या कालावधीत अर्जांची छाननी होईल. ९ जुलै रोजी छाननी अंतर्गत उमेदवारांची समितीमार्फत तपासणी करून तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात येईल .१२ ते १३ जुलैअखेर पात्र अर्जावर आक्षेप स्वीकारण्यात येतील. अंतिम पात्र उमेदवार गुणवत्ता यादी १४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका या पदांसाठी दहावी उत्तीर्ण, मदतनीस पदासाठी सातवी उत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता राहील. एखाद्या गावाच्या अंगणवाडी परिक्षेत्रात या शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार नसल्यास अंगणवाडी सेविका पदासाठी ही अट शिथिल करून नववी पास उमेदवाराचा अर्ज पात्र केला जाईल. यासाठी १५ जून २०२१ रोजी संबंधित उमेदवाराचे वय २१ पूर्ण व ३२ वर्षापेक्षा जास्त नसावे. संबंधित उमेदवारांनी आपले अर्ज समक्ष कार्यालयात दाखल करावेत. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रतेसाठी दहावी, सातवी गुणपत्रिका आवश्यक. जातीचा दाखला, विधवा, अनाथ मुलींसाठी सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक. रहिवासी, २ पेक्षा कमी अपत्य, शौचालय असल्या व वापराबाबतचा ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक यांचा दाखला आवश्यक आहे.

अंगणवाडी सेविकांसाठी रिक्त पदांची नावे पुढील प्रमाणे पाथरपुंज, नांव, सुरूल, वनकुसवडे, ढेबेवाडी, वरेकर नाव, सुरूल, वनकुसवडे, ढेबेवाडी वरेकरवाडी, शिबेवाडी. मदतनीस रिक्त गावे नानेल, पाथरपुंज, बीबी, वनकुसवडे, गावडेवाडी, घाणबी, जाईचीवाडी, खोनोली, सडावाघापूर, बेलवडे, ढेबेवाडी, मंद्रुळकोळे, अंबवडे खुर्द, ताम्हिणे, धामणी, रामिष्टेवाडी. मिनी अंगणवाडी सेविका गावे नानेल, मळे, शिरळ, भारसाखळे, वनकुसवडे अंतर्गत मिसाळवाडी, मरड, धनगरवाडा भिकाडी, काहिर, हुंबरणे, आटोली, गवळीनगर, मराठवाडी, जिंती अंतर्गत भातडेवाडी, नवीन वसाहत, सातर, बनपुरी, कसणी, करपेवाडी, तेटमेवाडी, सलतेवाडी या गावांचा समावेश आहे. संबंधित इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज विहित नमुन्यात कागदपत्रासहित संबंधित कार्यालयाकडे सुपूर्त करावेत, असे आवाहनही व्हि. बी. विभुते यांनी केले आहे.

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज