नगरसेविका सोनम जामसुतकर यांच्यातर्फे "जे जे" तील रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : युवासेनाप्रमुख महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक २१० च्या स्थानिक नगरसेविका सोनम जामसुतकर व शिवसेना मा.नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्यावतीने मुंबईतील प्रभाग क्रमांक २१० मधील सर जे जे हॉस्पिटल येथील बाल रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले.

यावेळी स्थानिक नगरसेविका सौ. सोनम जामसुतकर,शिवसेना मा. नगरसेवक मनोज जामसुतकर, डॉ.संजय सुरासे (अधीक्षक सर जे जे समूह रुग्णालय), डॉ.सौरभ कदम, डॉ. सुमित सुबोध, शाखाप्रमुख हेमंत मयेकर, महिला शाखा संघटक मेघा भोईर,माजी शाखा प्रमुख स्नेहा आवळेगावकर, जेष्ठ शिवसैनिक मयेकर ताई, ममता जैन,उपशाखाप्रमुख किशोर शेलार, जेठाभाई राठोड,जगदीश नलावडे, भरत सोलंकी, राकेश खानविलकर, जितेंद्र बोरीचा, उप विधानसभा समन्वयक योगेश झावरे,गट प्रमुख योगेश सोलंकी,जे जे हॉस्पिटल कामगार वसाहत येथील प्रमुख कार्यकर्ते संजय मोरे,रोहन मोरे आणि स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.