नगरसेविका सोनम जामसुतकरांनी केले टॅबलेट, लॅपटॉप व घरघंटीचे वाटप

 


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते,युवा सेनाप्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार, प्रभाग क्रमांक २१० च्या स्थानिक नगरसेविका सोनम जामसुतकर यांच्या विशेष नगरसेवक निधीतून प्रभाग क्रमांक २१० मधील शालेय वर्ष २०२० मध्ये दहावी व बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना टॅबलेट व लॅपटॉपचे तसेच विभागातील गरजू महिलांना घरघंटी व शिलाई मशीनचे दुसऱ्या टप्यातील वितरण शिवसेना सचिव सुरज चव्हाण व त्यांच्या पत्नी सुप्रीत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी स्थानिक नगरसेविका सोनम जामसुतकर, शिवसेना मा.नगरसेवक मनोज जामसुतकर, शिवसेना मा. नगरसेवक सुर्यकांत पाटील तसेच उपशाखाप्रमुख रॉनी बगेडिया, उपशाखाप्रमुख जेठाभाई राठोड, उपशाखाप्रमुख जितेंद्र बोरीचा, विभागातील जेष्ठ कार्यकर्ते श्राजेश सिंग तसेच विभागातील महिला, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.