गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या नावाची ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये नोंद


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ या अखिल भारतीय विश्वविक्रमांची नोंद घेणार्‍या पुस्तकात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या नावाची नोंद झाली आहे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून डाॅ.संदीप डाकवे यांनी ना. देसाई यांची 54 चित्रे काढून त्याची फ्रेम त्यांना भेट दिली होती. त्यानंतर डाॅ.डाकवे यांनी ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ कडे पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेतल्याने यासंबंधीचे प्रमाणपत्र, मेडल, पुस्तक इ.गोष्टी मिळाल्या आहेत.

गृहराज्यमंत्री ना.देसाई हे आपल्या अनोख्या कार्यशैलीने सर्वत्र ज्ञात आहेत. त्यांच्या नावाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये झाल्यामुळे पाटण तालुका मतदारसंघातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ना.देसाई हे ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये नोंद झालेले महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळातील पहिले मंत्री आहेत.

मंत्रीपदामुळे ना.शंभूराज देसाई यांचा प्रत्येक दिवस भरगच्च, प्रशासनाला सुचना, कोरोना बाधित गावांना भेटी, प्रवास, वेबिनार, जनतेची विचारपूस, यंत्रणेला फोनाफोनी, मतदार संघातील जनतेची कामे यामध्ये जातो. मंत्रीपदामुळे ना.देसाई यांचा प्रत्येक दिवस तसा व्यस्तच. इतकं असूनसुध्दा जनतेविशयी असणारा स्नेहभाव कधीही कमी झालेला दिसत नाही. ना.देसाई यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मतदारसंघ व त्याबाहेर ही ते लोकांच्या सुख दुःखात आवर्जून उपस्थित राहतात.

पाटण तालुक्याचे ना.देसाई यांचेकडे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन महाराष्ट्र राज्य अशी राज्याची 5 खाती आणि वासिम जिल्हयाचे पालकमंत्रीपद आहे. यामुळे त्यांचा प्रत्येक दिवस अत्यंत व्यस्त असतो.

‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये ना.शंभूराज देसाई यांच्या नावाची नोंद झाल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.