कोरोनाविरोधाच्या लढाईत कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कराडचा मदतीचा हात.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दहा हजार रुपयांची मदत.


कराड : ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्द करताना महेश खुस्पे, मंजिरी खुस्पे व ॲड. सतीश पाटील.

कराड  | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
ज्ञानांगण एजुकेशन सोसायटी च्या कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स , कराड तर्फे कोव्हिडच्या परिस्थितीत मदत म्हणून  महाराष्ट्र शासनाच्या "मुख्यमंत्री सहाय्यता कोविड १९" निधीस दहा हजार रुपयांची मदत केली. सदर रकमेचा धनादेश महाराष्ट्राचे सहकार व पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांच्या कडे सुपूर्द केला. या वेळेस कोटा अकॅडमी व कोटा जुनिअर कॉलेज तर्फे अध्यक्ष डॉ. महेश खुस्पे, उपाध्यक्षा सौ.मंजिरी खुस्पे व सचिव ॲड.सतीश पाटील यांची उपस्थिती होती . यावेळेस ना.बाळासाहेब पाटील यांनी कोटा ज्युनिअर कॉलेज या संस्थेचे अभिनंदन करून महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिलेल्या देणगी बद्दल समाधान व्यक्त केले. 

कोटा जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स हे मदतीस सदैव तयार असेल असे यावेळेस कोटा अकॅडमीचे व कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स चे अध्यक्ष डॉ. महेश खुस्पे यांनी सांगितले.