बाळकृष्ण बापू मोरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.


उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
येवती ता. कराड येथे ग्रामीण डाक सेवक म्हणून गेली 45 वर्ष सेवा करणारे बाळकृष्ण बापू मोरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त येवती येथे सत्कार करण्यात आला.                

बाळकृष्ण मोरे हे येवती परिसरातील वाड्या-वस्त्यांवर गेली 45 वर्ष ग्रामीण डाक सेवक म्हणून काम करत होते. काम करत असताना अतिशय नम्र सेवा ग्राहकांना त्यांनी दिली. या सेवेमध्ये प्रामाणिकपणा आणि सचोटी च्या माध्यमातून 45 वर्षाची सेवा केली. 

सेवानिवृत्त निमित्त डाक सेवा अधिकारी संजय सुतार, मेल ओव्हर शहर कराड पूर्वचे विभाग महेश माळी, अशोक भावके , समाधान गायकवाड, बाबासाहेब मदने, मोहन गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार समारंभ मोठ्या उत्साही वातावरणात covid-19 चे नियमांचे पालन करत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी येवती, हणमंतवाडी ग्रामस्त आणि परिसरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. 

Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
कुंभारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी भरवला बाजार
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : गुलाबराव जगताप
इमेज