धरणीमाता फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम ; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केले बियाणे वाटप

 

कुंभारगाव  | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील धरणीमाता फाउंडेशन गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक कार्यात सदैव एक पाऊल पुढे असते. मग यामध्ये कुंभारगाव परिसरातील झांडावर पक्ष्यांच्या खान्यापिण्यासाठी जलपत्रच्या माध्यमातून हजारो पक्षांना चारा व पाणी उपलब्ध करून दिला आहे. या वर्षी कडक उन्हाळ्यात येवती रस्त्यालगत असणाऱ्या झाडांना पाण्याची सोय करणे,अनाथ आश्रमातील मुलांना मदत असे अनेक उपक्रम धरणीमाता फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आले होते. धरणीमाता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश वाघ हे निसर्गप्रेमी असून त्यांनी या सेवेचे अखंड व्रतच घेतले आहे. सद्याचा कोरोना बिकट काळ पहाता शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली राहिलेली नाही अशा कुंभारगाव विभागातील शेतकऱ्यांना बांधावर जाऊन कडधान्येचे बियाणे वाटप करून त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. यावेळी एकूण 25 शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या 8 कडधान्याच्या बीयांनाचे वाटप करण्यात आले. सदर उपक्रमात धरणीमाता फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिलदादा शिंदे,विक्रम नलवडे, अजिंक्य माने , तानाजी कळंत्रे इत्यादी उपस्थित होते.
Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसहकार पतसंस्थेच्या वतीने जिजाऊ वस्तीगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज