सावली प्रतिष्ठानच्या वतीने वरेकरवाडी प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप.


पाटण  | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी ( कुंभारगाव) या सामाजिक ग्रुपच्या माध्यमातून जिल्हा परिषद वरेकरवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी हा सामाजिक ग्रुप अनेक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक आणि सामाजिक आजपर्यंत उपक्रम राबवले आहेत. याप्रसंगी मुख्याध्यापक विजय लोकरे सर, अंगणवाडी सेविका सौ.रंगूताई हनुमंत वरेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनिल वायचळ, संतोष धडम, विक्रम वरेकर(फौजी), प्रमोद मोरे, रवींद्र माटेकर, अरुण मोरे (फौजी), किशोर मोरे, मंगेश माटेकर, जालिंदर यादव, संदीप चिखले(फौजी) यांनी परिश्रम घेतले.