कु.तेजस्वीनी चोरगे हिची अभिनंदनीय निवड. दै.कृष्णाकाठ व विविध सामाजिक संस्थेकडून सत्कार.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

गलमेवाडी तालुका पाटण या ग्रामीण विभागातील कु.तेजस्विनी भरत चोरगेची, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदी नूकतीच नियुक्ती झाली आहे. तेजस्विनी चोरगे हिचे मूळ गाव गलमेवाडी ता पाटण सद्या तिचे कुटुंब तळमवाले येथे रहात आहे.

  नूकताच तिने पिपंरी चिंचवड येथे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. या तिच्या उत्तुंग यशाबद्दल दैनिक कृष्णाकाठ व ढेबेवाडी विभागातील अनेक सामाजिक संस्थांनी तिचे अभिनंदन केले. 

 कु.तेजस्विनी चोरगे हिच्या तळमावले निवासस्थानी जावुन तिचा शाल व श्रीफळ देवुन तिचा यथोचित मान सन्मान करुन तिला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या पुढील काळात तिची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा व्यक्त केली.

  नवभारत पतसंस्था,तळमावले , संजिवन प्रतिष्ठान कुंभारगाव , नवभारत एज्युकेशन ट्रस्ट कुंभारगाव , तळमावले ग्रामपंचायत आणि दै. कृष्णाकाठ या सर्वांच्या वतीने कु.तेजस्वीनी चा सत्कार करण्यात आला, दै.कृष्णाकाठ चे संपादक चंद्रकांत चव्हाण यांनीही तिच्या या यशाबद्दल खास अभिनंदन केले.

आपल्या विभागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या पदापर्यंत पोहचते ही खरच आनंदायी व अभिमानास्पद आहे.

यावेळी संजय भुलूगडे माजी उपसरपंच तळमावले ग्रामपंचायत,राजेंद्र पुजारी प्रतिनिधी दै.कृष्णाकाठ,प्रा सचिन पुजारी सचिव,संजिवन प्रतिष्ठान कुंभारगाव, श्री महेश कचरे -पाटील कलासंगम फोटो स्टुडिओ व दै.कृष्णाकाठ प्रेस फोटोग्राफर, कु.तेजस्वीनीचे वडील श्री भरत चोरगे व इतर मान्यवर उपस्थित होते.