विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नातून पाटण कोविड सेंटरला ४ व्हेंटिलेटर प्रदान.

 


पाटण कोव्हीड सेंटरला व्हेंटिलेटर प्रदान करताना सत्यजितसिंह पाटणकर, राजाभाऊ काळे, राजाभाऊ शेलार, श्रीरंग तांबे, अजय कवडे, बापूसाहेब टोळे, सुधाकर देशमुख, शंकरराव मोरे.

पाटण  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नातून व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्यातून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह (नवीन इमारत) कोविड सेंटरला ४ व्हेण्टीलेटर मशीन देण्यात आले. त्याचे लोकार्पण राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते येथील कोविड सेंटर प्रांगणात करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ काळे, नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष बापूराव टोळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय विकास अधिकारी सुधाकर देशमुख, शंकरराव मोरे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन युक्त १०० बेडची व्यवस्था झाली आहे. मात्र व्हेण्टीलेटर मशीनची कमतरता होती. ती माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नातून व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्यातून आज भरून काढली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने येथील कोविड सेंटरसाठी ४ व्हेण्टीलेटर मशीन उपलब्ध करून दिले. यापूर्वी येथे व्हेण्टीलेटर मशीन नसल्याने कोरोना रुग्णांना कराड, सातारा, पुणे, कोल्हापूर येथे जावे लागत होते. तसेच व्हेण्टीलेटर बेड उपलब्ध नसल्यास अनेक रुग्णांची ससेहोलपट झाली आहे. येथून पुढे तालुक्यातील रुग्णांचे होणारे हाल थांबविण्यासाठी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या माध्यमातून या कोविड सेंटरला व्हेण्टीलेटर बेड उपलब्ध झाले आहेत. सुदैवाने रुग्णांची संख्या कमी आली असली तरी अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही. पुढील काळातही कोरोनाला शह देण्यासाठी तालुक्यातील सर्व यंत्रणा सज्ज आहेत. तरीही नागरिकांनी स्वतः ची काळजी घेऊन कोरोनाला हद्दपार केले पाहिजे. 

यावेळी पाटणचे नगरसेवक किरण पवार, डॉ. बर्गे, डॉ. मोळावडे, जिल्हा बँकेचे प्रताप कोळी, कोंडीबा बेबले, धिरज लुगडे यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज