विलाश्री थाळी जन सामांन्यांसाठी आधार : ॲड.उदयसिंह पाटील उंडाळकर

 विलाश्री थाळी उपक्रमास भेटी प्रसंगी ॲड.उदयसिंह पाटील उंडाळकर समवेत प्रा.धनाजी काटकर, जयंत कुराडे व इतर

मलकापूर| कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कराड परीसरामध्ये 'विलाश्री थाळी' मुळे कोरोना रुग्णांची व नातेवाईकांची मोफत जेवणाची सोय झाली आहे. रूचकर व पोष्टीक जेवणामुळे कोरोना बाधितांना व त्यांच्या नातेवाईकांना मोठा आधार मिळाला आहे. येथील युवकांनी पुढाकार घेवून केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. इतर युवकांनी याचा आदर्श घेवून महामारीच्या काळात जी मदत करता येईल ती करण्यासाठी पुढाकार घ्यावा.असे प्रतिपादन युवा नेते उदयसिंह पाटिल यांनी केले.

स्व. विलासराव पाटील - उंडाळकर (काका) यांच्या स्मरणार्थ व सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या समाजकार्याच्या प्रेरणेतुन  येथील नगरसेविका सौ. कमल कुराडे, हॉटेल सातारी गावरान ठसका चे प्रशांत पाचुपते व जयंत कुराडे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.एका महीन्यात 1260 कोरोना पिडितांनी याचा लाभ घेतला आहे. श्री. पाटील यांनी आज प्रत्यक्ष जाऊन या उपक्रमाची माहिती घेवून जेवणाचा अस्वाद घेतला. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी रयत संघटनेचे प्रा.धनाजी काटकर, नगरसेवक सागर जाधव, प्रशांत पाचपुते, सत्यवान पाटील, अमर इंगवले, जीवन पाटील, स्वप्निल बारटक्के यंची प्रमुख उपस्थित होती.

श्री.कुराडे म्हणाले, अनेक कोरोना रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जेवण मिळत नाही त्यांचे हाल होतात.अशा गरजूंची जेवणाची सोय व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवला आहे. 29 एप्रिल ला मोफत विलाश्री थाळी सुरू केली.घरगुती व चांगल्या दर्जाचे जेवण कराड परीसरातील रूग्णालयांमध्ये पोहोच केले आहे. एका महीन्यात 1260 लोकांना त्याचा लाभ घेतला. याचे समाधान आहे. शासनाच्या नियमांचे व वेळेचे पालन करून सायंकाळी ७ ते ८ या वेळेत पौष्टीक विनामूल्य भोजन दवाखान्यात दिले जाईल. ज्याना आवश्यकता आहे त्यांनी संपर्क साधावा. असे अवाहनही श्री.कुराडे व श्री.पाचुपते यांनी केले आहे.

____________________________________

परगावच्या कोरोना बाधितांचे व नातेवाईकांचे जेवण मिळत नसल्याने त्यांना उपाशीपोटी रहावे लागते. ही गरज ओळखून शहरातील प्रत्येक रुग्णालयाबाहेर व सोशल मीडिया द्वारे आम्ही संपर्क नंबर पाठवले आहेत. गरजूंनी संपर्क साधून त्याचा लाभ घ्यावा. होम आयसोलेशन असणाऱ्या बाधितांना ही आम्ही जेवणाचे डबे पोच करत आहोत.

सामाजिक कार्यकर्ते जयंत कुराडे ,
 प्रशांत पाचपुते
____________________________________