श्रेया आय केअर सेंटर तळमावलेचे संदीप मोहिते यांची सामाजिक बांधिलकी.

 

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
माझे गाव माझी जबादारी हे सूत्र हाती घेऊन श्रेया आय केअर सेंटर तळमावलेचे संदीप मोहिते यांनी कोचरेवाडी या मुळ गावी सॅनिटायझर, सॅनिटायझर मशीन, 600 N 95 मास्क, ऑक्सीमीटर व थर्मामीटर चे गावात वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी गतवर्षीही कोरोना काळात रस्त्यावर उतरून समाजाची सेवा करणारे, बंदोबस्ताला सदैव 24 तास तैनात असणारे पोलीस कर्मचारी, होमगार्ड व सामाजिक कार्यकर्ते यांनाही मास्क सॅनिटायझरचे वाटप केले होते. नुकतेच त्यांनी आपल्या जन्मगावी कोचरेवाडी येथेही  असाच सामाजिक उपक्रम राबवला यातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

यावेळी चाफळ पोलीस कर्मचारी अमृत आळंदे, श्री.शिंदे, सतीश कचरे, गावचे सरपंच दगडू मोहिते, उपसरपंच नंदा मोहिते, पोलीस पाटील जयश्री मोहिते, बबन मोहिते, बाळासो मोहिते, गणपत मोहिते, बापुराव मोहिते, सचिन मोहिते, भरत मोहिते, निलेश मोहिते, रोहित मोहिते इत्यादी उपस्थित होते.