दुचाकीच्या अपघातात कुंभारगाव येथील युवकाचा मृत्यू.

 

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कराड- ढेबेवाडी रस्त्यावर पाटण तालुक्‍यातील काढणे फाट्यानजीक दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात कुंभारगाव ता. पाटण येथील युवक ठार झाला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कुंभारगाव येथील सागर गणपत कचरे (वय वर्षे २८) या युवकाचा शुक्रवारी रात्री कराड - ढेबेवाडी रस्त्यावर काढणे फाट्यानजीक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. तो युवक आणि त्याचा मित्र शुक्रवारी पाचवड फाटा ता.कराड येथून दुचाकीवरून कुंभारगावला परतताना रस्त्यावर आलेल्या दगड व मातीमुळे गाडी घसरली आणि त्यांचा अपघात झाला. 

या अपघातात सागर कचरे यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यांना उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा रविवारी मृत्यू झाला त्याच्या अचानक जाण्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज