ई पोस्टर स्पर्धेत श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसीची अंकिता माने तृतीय.

 उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी [ डी. फार्मसी ] ची विध्यार्थिनी कु.अंकिता माने हिने ई पोस्टर स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

बापूसाहेब देशमुख सेवा प्रतिष्ठान संचालित सिद्धीज इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नांदगाव येथे जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय पातळीवर ऑनलाईन ई पोस्टर स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे हेड ऑफ डिपार्टमेंट सर्जरी डॉ.सिद्धार्थ पी. दुभाशी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी ७०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. कु. अंकिता माने हिला प्राचार्या वैशाली महाडीक व स.प्रा. स्नेहल सातपुते यांनी मार्गदर्शन केले. 

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.शशिकांत पाटील, उपाध्यक्षा डॉ.उषा जोहरी, सचिव श्री.प्रसून जोहरी, ट्रस्टी सौ.प्राजक्ता जोहरी, संचालक श्री.सागर पाटील, प्राचार्या वैशाली महाडीक सर्व शिक्षक व शिक्षेकतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसहकार पतसंस्थेच्या वतीने जिजाऊ वस्तीगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज