चेंबूरमध्ये नगरसेवक अनिल पाटणकरांनी दिव्यांगाना दिला आर्थिक मदतीचा हात

 मुंबई  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कोरोनाच्या जागतिक संकटामध्ये अनेक नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. लॉकडाउनमूळे अनेकजण बेरोजगार बनून जीवनाला कंटाळले आहेत. यात सर्वांत मोठा फटका दिव्यांगानाही बसला आहे.त्यामुळे बेस्ट समिती अध्यक्ष व चेंबूरचे वॉर्ड क्रमांक १५३ चे नगरसेवक अनिल पाटणकर आणि लोकप्रिय समाजसेविका व जनहितवर्धिनी फौंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी पाटणकर यांच्या संकल्पनेतून लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार झालेल्या अनेक दिव्यांगाना त्यांच्याच मागणीनुसार पुन्हा त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक हातभार लावण्यात आला तसेच त्यांना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. 

यावेळी शाखाप्रमुख उमेश करकेरा, महापालिका अधिकारी प्रथमेश जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक शशिकांत घाग, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये, संदीप गुरव व मान्यवर उपस्थित होते.