कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी(कुंभारगाव) या सामाजिक ग्रुपच्या माध्यमातून कुंभारगाव शाळा नंबर 3 मध्ये जागतिक योगा दिनाचा योग साधून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सावली प्रतिष्ठान चिखलेवाडी हा सामाजिक ग्रुप अनेक सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर आहे. या प्रसंगी सुदाम चव्हाण, उत्तम मारुती मोरे (मुकादम), किशोर वरेकर, संभाजी माटेकर, विक्रम टोळे, गणेश वरेकर व चिखलेवाडी शाळेमधील श्री एकनाथ पाटील गुरुजी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निवास मोरे, शरद किसन मोरे, पवन अशोक माटेकर, राजेश प्रकाश वरेकर, संजय निवृत्ती नाटेकर आणि संदीप तुकाराम मोरे यांनी परिश्रम घेतले.