छाया : कलासंगम फोटो
तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित आकडा कमी होत असला तरी ग्रामीण भागात कोरोना बाधित संख्या कमी होत नसल्याने शनिवार व रविवार या दिवशी कडक विकेंड लोकडाऊन लावण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवेत नसलेले विनाकारण फिरणार्यांना पोलीस प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले यांच्या वतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पकडून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या मध्ये एकूण 25 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यातील 2 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आढळून आला. ढेबेवाडी पोलीस स्टेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले यांचे संयुक्त विध्यमाने हि मोहीम राबवण्यात आली.
अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, खते बी बियाने, दुकान व्यतिरिक्त सर्व दुकाने बंद आहेत. विनाकारण बाहेर फिरू नका असे पोलिस वारंवार सांगत आहेत मात्र तरीही काही ठिकाणी लोक विनाकारण फिरताना आढळून येत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे आशी माहीती ढेबेवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी दिली.
या वेळी तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकिय अधिकारी डॉ.उमेश गोंजारी, आरोग्य सहाय्यक जामसिंग पावरा, आरोग्य सेवक रोहीत बोकरे, एमपीडब्लयु स्वप्नील कांबळे, पोलीस कर्मचारी अजय माने, एम ए पवार, पोलीस पाटील अमित शिंदे, विशाल पाटील यांनी या कारवाई कॅम्प मध्ये भाग घेतला.