कृष्णा कारखाना निवडणुकीच्या मतमोजणी निमित्त कराड शहरातील वाहतुक व्यवस्थेत बदल


सातारा दि. 30 (जिमाका) : कृष्णा कारखाना निवडणूक 2021 च्या अनुषंगाने कराड तालुक्यातील मतदान केंद्रांतील मतदानाची मतमोजणी दि. 1 जुलै 2021 रोजी कराड शहरातील रत्नागिरी गोडावुन इमारत, ता. कराड, जि. सातारा या ठिकाणी पार पडणार आहे. या परिसरातील अंतर्गत वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसार दि. 1 जुलै रोजी 0.00 वाजलेपासून ते मतमोजणी प्रक्रिया पार पडेपर्यंत खालील प्रमाणे वाहतुकीच्या मार्गात बदल केला आहे.

वाहतुक मार्गातील तात्पुरता बदल : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ – कार्वे नाका ते भेदाचौक जाणारा रोड, एस. टी. बस व अवजड वातुकीसाठी चालु ठेवण्यात येणार असुन दुचाकी वाहने, चारचाकी, रिक्षा या लहान वाहनाकरीता सदरचा मार्ग बंद राहील.

पर्यायी वाहतुक व्यवस्था : कार्वे नाका मार्गे कराड शहरात येणारे मोटार सायकल व सर्व प्रकारचे वाहनांकरीता – कार्वे नाका ते मुजावर कॉलनी येथुन इदगाह मैदान मार्गे कामागर चौक मार्गे जातील.

वाहन पार्किंग व्यवस्था : कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुक मतमोजणी अनुषंगाने येणारी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची वाहने जूने तहसिल कार्यालय मैदानात पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.

कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुक मतमोजणी अनुषंगाने येणारे नागरिकांचे सर्व प्रकारचे वाहनाकरीता वरद मेडिकल समोरील मैदानात पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.

तरी या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.