माझगावच्या प्रभाग क्रमांक २१० मध्ये हायमास्ट दिव्यांचा लोकार्पण सोहळा

 


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

मुंबई - माझगाव विभागातील प्रभाग क्रमांक २१० च्या स्थानिक नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर यांच्या नगरसेवक निधीतून तसेच शिवसेना मा. नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या विषेश प्रयत्नाने प्रभाग क्रमांक २१० मधील शेठ मोतीशाह लेन येथील कोपरगाव इस्टेट प्रवेशद्वार याठिकाणी तसेच सेंट मेरी रोड येथील दलपत कोळी चौक या दोन ठिकाणी हायमास्ट (प्रखर विद्युत) दिवे बसविण्यात आले. या दोन्ही हायमास्ट लॅम्पचा लोकार्पण सोहळा प्रभाग क्रमांक २१० च्या स्थानिक नगरसेविका सोनम जामसुतकर व शिवसेना मा. नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी शिवसेना मा. नगरसेवक सुर्यकांत पाटील तसेच शाखाप्रमुख हेमंत मयेकर,महिला शाखा संघटक मेघा भोईर, माजी शाखाप्रमुख रमेश चेंदवनकर, उपशाखाप्रमुख जेठाभाई राठोड, उपशाखाप्रमुख जगदीश नलावडे,उपशाखाप्रमुख जितेंद्र बोरीचा,ज्येष्ठ शिवसैनिक राजेश सिंग,

युवासेना उपविभाग अधिकारी अभय शेडगे, उपविधानसभा समन्वयक योगेश झावरे, माझगावचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल खानोलकर काका, लव्हलेन विभागातील कार्यकर्ते व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
कुंभारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी भरवला बाजार
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : गुलाबराव जगताप
इमेज