कोरोना काळात मुंबईतील कचऱ्याचे प्रमाण कमी झाले

 मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉक डाऊन निर्बंधांमुळे मुंबईतील कचऱ्याच्या प्रमाणात बरीच घट झाली आहे.रोजचा कचरा सुमारे ५०० टनांनी कमी झाला आहे. मात्र या काळात वैद्यकीय कचरा वाढला आहे.

मुंबईत दररोज ६ हजार मेट्रिक टन कचरा जमा होत असतो. मात्र आता हे प्रमाण ५३०० ते ५५०० मेट्रिक टनांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या काळात मुंबई स्वच्छ आणि सुंदर होत आहे. मुंबई पालिकेने २ ऑक्टोबर २०१७ पासून सोसायट्यांना कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले आहे.ओला आणि सुका कचरा वेगळा करून जमा केला जात आहे.मात्र सध्याच्या कोरोना काळात वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे.मुंबईत दररोज सुमारे १७ ते १८ मेट्रिक टन जमा होणारा वैद्यकीय कचरा आता २० ते २२ मेट्रिक टन इतक्या प्रमाणात जमा होत आहे.

Popular posts
ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी, कुंभारगाव व काढणे विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.
इमेज
'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्या बद्दल सारंग पाटील यांचा 'जनसहकार'च्या वतीने सत्कार.
इमेज
आधार फाऊंडेशनच्या वतीने ड्रायव्हर दिन साजरा.
इमेज
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांचा 'जनसहकार' तर्फे सत्कार
इमेज
'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण
इमेज