केंद्रीय पथकाकडून धारावीत राबवत असलेल्या मोहिमेबद्दल भारतीय जैन संघटनेचे केले कौतुक

  


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
केंद्रीय आरोग्य समितीने बुधवारी संध्याकाळी धारावीची पाहणी केली.त्यावेळी त्यांनी छोटा सायन हॉस्पिटल येथील लसीकरण केंद्राला भेट दिली.यावेळी त्यांनी भारतीय जैन संघटना धारावीत राबवत असलेल्या "माझी धारावी माझी जबाबदारी" मिशन लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या कामाची दखल घेतली व प्रशंसा केली. मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने धारावीतील प्रत्येक प्रभागात पथनाट्य तसेच विविध माध्यमातून आणि कलाकारांच्या आवाजात जनतेला ध्वनीक्षेपातून  वेगवेगळे संदेश देऊन जनजागृती करून धारावीतील नागरिकांना लसीकरण किती महत्वाचे आहे हे पटवून दिले जात आहे. त्यामुळे धारावीतील लसीकरण मोहीम यशस्वीपणे सुरू असून कोरोनाबधितांची संख्या देखील कमी प्रमाणात आल्याने या सर्व बाबींची माहिती केंद्रीय समिती पथकाने घेतली आणि भारतीय जैन संघटनेची प्रशंसा केली. 

   यावेळी मुंबई महानगरपालिका जी/नॉर्थ चे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. विरेंद्र मोहिते हे केंद्रीय समिती पथकासोबत उपस्थित होते.

Popular posts
ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी, कुंभारगाव व काढणे विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.
इमेज
'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्या बद्दल सारंग पाटील यांचा 'जनसहकार'च्या वतीने सत्कार.
इमेज
आधार फाऊंडेशनच्या वतीने ड्रायव्हर दिन साजरा.
इमेज
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांचा 'जनसहकार' तर्फे सत्कार
इमेज
'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण
इमेज