हॉटस्पॉट बनपुरी सावरतेय! आरोग्य विभागाचे परिश्रम व ग्रामस्थांचे सहकार्य यातून कोरोना रोखण्यात यश.


तळमावले | राजेंद्र पुजारी :
पाटण तालुक्यातील बनपुरी हे गाव काही दिवसापूर्वी कोरोना हॉटस्पॉट बनले होते येथील 125 लोकवस्ती असणाऱ्या कंकवाडी तील एकाच कुटुंबात पंधरा जण कोरोनाबाधित झाले होते.  गेल्या महिनाभरात बनपुरी गावाने कोरोना बाधित रुग्णांची शंभरी गाठली होती इतक्या मोठ्या प्रमाणात या गावात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आरोग्य विभाग व प्रशासनही सतर्क झाले होते. यामुळे या गावाकडे आरोग्य विभाग व प्रशासनाचे अधिक लक्ष होते आरोग्य विभाग व ग्रामस्थांनी कोरोना हद्दपार करण्यासाठी कंबर कसली होती. कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे ग्रामस्थ काटेकोरपणे पालन करीत होते व आरोग्य विभागास सहकार्य करत होते, नियमांचे पालन केल्यानेच कोरोना रोखण्यात बनपुरी ग्रामस्थांना यश प्राप्त झाले आहे . आरोग्य विभागाचे परिश्रम व ग्रामस्थांचे सहकार्य यातूनच कोरोना वर मात करण्यासाठी हे गाव सज्ज झाले व अनेक कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले या गावाची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे अवघे 23 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. यापुढे कोरोना चा संसर्ग वाढू नये व गावाला या संकटापासून वाचण्यासाठी स्वतःवर कडक निर्बंध घालून घेतले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यात ग्रामस्थांना यश येत आहे.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल आरोग्य विभाग व गावची कोरोना कमिटी यांची आढावा बैठक संपन्न झाली. गेल्या महिन्याभरात शतकाकडे वाटचाल करणारे गाव यापैकी एकूण 42 रुग्ण चांगल्या प्रकारचे उपचार घेवुन कोरोना मुक्त झाले,त्यापैकी 15 रुग्ण जुजबी उपचाराने घरातच बरे झाले,5 रुग्ण मयत झाले.23 रुग्ण आज अखेर पॉजिटिव्ह असुन पैकी 3 रुग्ण कराड, मुंबई येथे उपचार घेत असुन गावची परिस्थिती पुर्वपदावर आणण्यात, ग्रामपंचायत, आरोग्यविभाग, कोरोना कमिटी, यशस्वी होताना दिसत आहे.

ग्रामस्थांनी विनाकारण घराबाहेर पडू नये . सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक सनिटायजरचा वापर करणे, हात सातत्याने स्वच्छ धुणे. आरोग्य विभागाने सांगितलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे. अशा प्रकारच्या सूचना आढावा बैठकीत देण्यात आल्या. तसेच भविष्यात कोरोनाचा परिणाम आपल्या गावावर होवू नये यासाठी कडक निर्बंध व खबरदारी घेण्याचे या आढावा बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. 

या प्रसंगी सदस्य शिवाजीराव पवार, ग्रामसेवक तानाजी जाधवर , पोलिस पाटील दत्तात्रय कुंभार , बनपुरी प्राथ.उपकेंद्र च्या डॉ पूनम शिंदे,आरोग्य सेवक भांडे, शिक्षक जगताप सर, मोकाशी मॅडम, महाडिक मॅडम व आशासेविका उपस्थित होते.