कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 

कराड येथील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामाची खा. श्रीनिवास पाटील यांनी शुक्रवारी जागेवर जाऊन पाहणी केली. प्रगतीपथावर असणा-या सदर रस्त्याच्या कामाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

      खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड येथील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामासाठी 3 कोटी 50 लाख एवढा भरीव निधी मंजूर झाला आहे. कराड ते विटा हा मार्ग कराड शहरातून जात असून कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना प्रवास करताना गैरसोयीचे ठरत होते, तर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने या मार्गावरील वहानांसाठी अडथळा निर्माण होऊन शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत होती. त्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली होती. या मागणीनुसार खा. श्रीनिवास पाटील यांनी हा भरीव निधी मंजूर करून घेतला आहे.

       सध्या या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. शुक्रवारी खुद्द खा.श्रीनिवास पाटील यांनी सुरू असलेल्या कामाची पहाणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली. तसेच नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने सदर कामाचा अधिका-यांकडून आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. 

यावेळी जयंत पाटील, जयंत बेडेकर, सारंग पाटील, रणजीतसिंह पाटील, पोपटराव साळुंखे, सद्दाम आंबेकरी, शिवाजीराव पवार, गंगाधर जाधव, प्रशांत शिंदे, अनिल धोत्रे व उपअभियंता निखिल पानसरे उपस्थित होते.

    दरम्यान लाॅकडाऊनमुळे कराड शहरातील या रस्त्यावरील रहदारी बंद असल्याने सदरच्या कामास गती मिळाली आहे. तसेच कामाची गुणवत्ता उत्तम असून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसहकार पतसंस्थेच्या वतीने जिजाऊ वस्तीगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज